Sunday, July 2, 2017

झटपट होणार्‍या पाककृती:



गेले काही दिवस मी स्वत: एक प्रयोग करते आहे. स्वयंपाकघरात दोन्ही वेळचे जेवण अशा प्रकारचा स्वयंपाक असेल तर आणि तरच तासभर घालवायचा. बाकी शक्यतो अधल्या मधल्या वेळचे खायला हवे असेल तर १०-१५ मिनिटे खर्च होतील इतपत झट्पट काही तरी तयार करायचे. अर्थात यातल्या बहुतेक युक्त्या उन्हाळ्यात कामी येतात. कारण अगदी गरमागरम पानात पडावे असे याकाळात वाटत नाही. दुपारी पोळी भाजी असेल तर रात्री दही भात आणि एखादे सॅलड पण पुरते.
यासाठी तयारी मात्र करुन ठेवावी लागते. मुख्य तयारी म्हणजे खरेदी. आठवड्यातून किमान एक, कमाल दोन वेळा भाजी आणि फ़ळे खरेदी करुन ठेवणे. त्याचबरोबर ग्रोसरी स्टोर मधून ऑलिव्हज, काही सॉस, पनीर, मोझेरेला चीझआणून ठेवणे. शक्यतो बिस्किटे, ब्रेड, नूडल्स विकत घेण्याचा मोह टाळणे, त्याऐवजी खाकरे, पॉपकॉर्न वा अन्य कसल्याही लाह्या, थालिपीठ भाजणी, शक्य असेल तर थोडा सुका मेवा आणून ठेवणे अशीही तयारी करावी लागेल. त्यासोबत फ़्रीजमध्ये किमान एक तरी मोड आलेले कडधान्यं तयार असेल अशी काळजी घ्यायला लागेल. आणि सॅन्डविच मसाला, पाणीपुरी मसाला,चाट मसाला असे काही मसाले.
या सगळ्या गोष्टींची आकर्षक कॉम्बिनेशन केली तर चटकन सगळ्यांना आवडेल असे खाणे तयार करणे शक्य होईल.
१.  घरात कलिंगड, पपई, टरबूज अशी फ़ळे आणून त्यांच्या चौकोनी आकाराच्या फ़ोडी तयार करुन ठेवाव्यात. वर क्लिंग फ़िल्म लावावी वा  घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्या आणि फ़्रीजमध्ये ठेवाव्या. अगदी केव्हाही हाताशी रहातात. त्यात सफ़रचंद, आंबा, केळे, मोसमानुसार स्ट्रॉबेरी, अंजीर अशी फ़ळे मिक्स करुन फ़्रुट डिश देता येते. किंवा एक छोटी डिश भरुन यातले एखादे फ़ळ खाल्ले तर पोट भरते. किंवा फ़ळे, चीज/पनीर अशी एकत्र डिश विथ चाट मसाला.
२.   एखादे कडधान्य विशेषत: मूग, मटकी वा छोले भिजत घालून मोड आणून ठेवलेले असतील तर तेलावर परतून वा उकडून मीठ, मिरची, लिंबू, कांदा घालून पटकन चाट तयार होते. या पदार्थाला कधीही कोणीही नाही म्हणत नाही. आवडत असेल तर शेव, भाजलेले शेंगदाणे, कुरमुरे हवे ते हवे तेव्हा मिसळता येईल.
salad
३.   अमेरिकन कॉर्न उकडून ठेवावे, यात कांदा, टोमॅटो, लेट्युस, ब्लॅक ऑलिव्हज सगळे चिरुन त्यात मेयो किंवा एखादे इटालियन सीझनिंग घातले तर पटकन सॅलड तयार होते. खाकरा आणि हे सॅलड मस्त कॉम्बिनेशन जमते. यात थोडे बेदाणे आणि खारे शेंगदाणे घातले तर अजून मजा येईल. वर सॅन्डविच मसाला भुरभुरावा.
४.  दही आणि फ़ळे हे देखील दुपारी खायला द्यायला चांगले कॉम्बिनेशन आहे. हेच खाकरा, थालिपीठ, पराठा यासोबत खायचे असेल तर अगदी बारीक चिरलेली फ़ळे दही साखर एकत्र करुन त्यात घालावी. आवडत असेल तर व्हॅनिला दही वा इसेन्स दह्यात घालावा. सफ़रचंद, डाळिंब, केळे, स्ट्रॉबेरी यांचे रायते छान लागतात. खरे तर पार्टीला करण्यासाठी ही फ़ार छान डिश आहे, फ़ळे दह्यात काळी पडत नाहीत त्यामुळे करुन फ़्रीजमध्ये ठेवले तरी चालते. हवी तर ड्रायफ़्रुटस घालता येतील.
५.   जर परदेशात असाल तर सावर क्रीम मिळते, तेही फ़्रुट सॅलड मध्ये छान लागते.
६.  काकडीच्या स्टिक्स, गाजराच्या आणि उकडलेल्या बीटच्या सळ्या चिरुन एखाद्या डिप/सॉस सोबत खायला छान लागतात.
७.  बारीक चिरलेला पालक, किसलेले गाजर, आणि काळ्या मनुका वा बेदाणे यांचे मेयॉनीज मध्ये केलेले सॅलड मस्त लागते. पण अगदी थोडे खपते.
८.  बदाम, काजू, अक्रोड आणि आवडणार कोणतेही सुके मेवे (मनुका/बेदाणे सोडून)थोड्या तुपावर परतून अगदी थोडे काळे मीठ, तिखट घालून परतावे. थंड करुन डब्यात भरुन ठेवावे. असेच शेंगदाणे चांगले भाजून मग अगदी थोडे तूप, मीठ,तिखट घालून तयार करता येतील. थंड करुन डब्यात भरुन ठेवावे. बाहेरुन आल्यावर चार दाणे खायला बरे वाटतात.  
असे चटकन होणारे पदार्थ अगदी पटकन तोंडात टाकायला देता येतात किंवा त्यांचे चांगले कॉम्बिनेशन ब्रेकफ़ास्ट, लंच, डिनर ला होते. आणि रविवारी सकाळी ब्रेकफ़ास्ट सोबत यातले एक दोन प्रकार केले तर मस्त ब्रंच होतो आणि बराच रिकामा वेळ आपल्या कामासाठी वा कुटुंबासोबत घालवायला मिळतो.
उदा. सकाळी उपमा, पोहे+ दह्यातले रायते किंवा कडधान्याचे सॅलड  किंवा संध्याकाळी पॉपकॉर्न (जे साधारण २.४० मिनिटात मायक्रोवेव्ह मध्ये तयार होतात) त्यासोबत फ़ळांचे तुकडे आणि ऑलिव्हज देता येतील. किंवा कधी चीज/पनीर, फ़ळांचे तुकडे यावर चाट/सॅन्डविच मसाला घालून फ़्रुट डिश म्हणून देता येईल.
रात्रीच्या जेवणासाठी खिचडी शिजत असेल तर बरोबर फ़ळे, कडधान्यं वा फ़ळाचा रायता देता येईल. कुकरच्या शिट्या होईपर्यंत दहा मिनिटात साइड डिश बनते.
कधी फ़ळे, त्यावर चवीत बदल म्हणून एखादा खाकरा/एखादा थालिपीठाचा तुकडा आणि वर कॉफ़ी/चॉकोलेट मिल्क असे कॉम्बिनेशन सकाळी ब्रेकफ़ास्टला देता येईल. सकाळी फ़िरुन आल्यावर फ़ारसे कष्ट न करता असा ब्रेकफ़ास्ट  १० मिनिटात तयार होतो. वॉक कॅन्सल न करता छान नाश्ता मिळाला तर बरेच वाटते.

सध्याच्या वेगवान जीवनात सतत काही तरी रेडी टु इट किंवा ब्रेड-बटर असे खायला तर नको असते पण सारखे नवनवे पदार्थ करायला वेळही नसतो. मुले अभ्यास करीत असली की सारखे माकडखाणे हवे असते पण पोटभरीचे द्यावे तर डुलक्या येतात आणि नुसती फ़ळे नको असतात . तळकट देणे आपल्याला पटत नाही. पोळी भाजी तर बिग नो नो  मग डोके लढवावे लागते.
यासाठी रंगत होम डिलिवरी कडे उपलब्ध असलेल्या गोष्टी:
सुरज/लक्ष्मी ड्राय भाकरी
माऊथ मेल्ट थेपला
गालाजी सॅन्डविच मसाला
मदर टच/चकरी खाकरा
मेयोनीज
चॉकोलेट मिल्क मिक्स