Thursday, December 1, 2016

बाजरीचे चूरमा लाडू:


  1 वाटी बाजरीचे पीठ घेऊन त्यात थोड़े साजूक तूप घालावे. आणि कोमट पाण्यात पीठ भिजवून त्याची भाकरी करून घ्यावी. चांगली खमंग भाजून घ्यावी. दोन वा तीन भाकऱ्या होतील. त्या थंड झाल्यावर ड्राय ग्राइंडर मध्ये घालून त्याचे रवाळ पीठ करावे. थोड्या साजूक तूपावर पीठ भाजावे. त्यात गुलाबी रंगावर भाजलेला डेसीकेटेड कोकोनट/ सुके खोबरे, दाण्याचे कूट, तिळकूट, काजू पूड/ ड्राइफ्रूट्स पूड, खारीक पावडर यातले जे आवडेल ते घालावे. वेलची पूड आणि गूळ घालावा. गुळाचे खड़े मोडून नीट मिश्रण तयार करून लाडू वळावे.

लाडू लगेच तयार होत असले तरी एक दिवस ठेवून द्यावे व दुसर्‍या दिवशी खावे. सुरेख चव येते

No comments:

Post a Comment