Monday, November 28, 2016

बनाना कढ़ी


प्रोडक्ट: गायीचे तूप, TFL बेसन, गालाजी छास मसाला

रेसिपी:अर्धा डझन केळी आणली तर त्यातले एखादे बिचारे मागे रहाते, त्या काळ्या पडलेल्या केळयाला कोणी वाली उरत नाही. अशा वेळी कढीत टाकले तर पटकन संपते आणि नैसर्गिक गोड़वा येतो. अशी कढ़ी करताना लवंग, दालचीनीचा मसाला, वा आले मिरची टाळावे. केळयाचा स्वाद लागत नाही. एका भांड्यात पातळसर ताक घेऊन त्याला बेसन लावावे. त्यात मीठ, साखर, गालाजी छास मसाला घालावा. मग साजूक तूपाची जिरे, हिंग घालून फोडणी करावी. कढीलिंबाची पाने, कोथिंबीर,लाल मिरची आणि केळयाच्या फोड़ी घालाव्या. छान परतून मग ताकाचे मिश्रण घालावे. चांगली उकळी आणून गरम कढ़ी प्यायला द्यावी.                      

No comments:

Post a Comment