Saturday, November 26, 2016

मिश्र भाज्यांचे लोणचे

                 
प्रॉडक्ट: गालाजी खाकरा थेपला चटणी


सध्या खूप बिझी स्केड्यूल चाललं आहे. बाहेरुन दुपारी घरी आलं की जेवायला सकाळची पोळी भाजी असते आणि आणखी काही तरी हवंसं वाटतं. घरगुती चटण्या, लोणची, चिवडा असलं काही तरी हाताशी असेल तर बरं पडतं या विचाराने आज भाजीचं लोणचं करायला घेतलं. कॉलीफ्लोवर, गाजर आणि कोवळे मटारचे दाणे मीठ, हळद घालून वाफवून घ्यावे. मग एका किचन टॉवेलवर टाकून  थोड़े कोरडे करावे. त्याला गालाजी खाकरा थेपला मसाला लावावा. हवे तर थोड़े मीठ घालावे. वरुन लिंबू पिळावे आणि हिंग, हळद, मोहरीची फोडणी थोड़ी थंड करून वरुन घालावी. चवीनुसार तिखट हवे असेल तर घालू शकता. हे लोणचे घातल्यावर दोन तासात ताजे ताजे खायला होते. फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस खाऊ शकता.

गालाजी खाकरा थेपला चटणीला मेथी आणि मोहोरीचा गन्ध आहे. त्यामुळे लोणच्याचा मसाला वापरण्याऐवजी ही चटणी वापरून देखील चटकदार लोणचे होते. लिंबू-तिखट-मीठाने थोड्या वेळाने छान खार सुटतो.

No comments:

Post a Comment