Sunday, November 27, 2016

Desi Videsi पुरणपोळी मिक्स

देसी विदेसी पुरणपोळी:
प्रॉडक्ट्स: देसी विदेसी पुरणपोळी मिक्स, साजूक तूप, TFLकणीक
मनापासून मान्य करते हे इंटेलिजंट प्रॉडक्ट आहे. एका छोट्या पिशवीत हरभर्‍याच्या डाळीचे पुरण अशा प्रकारे प्रोसेस केलेले आहे की त्याची कोरडी पूड तयार होईल. त्या मिश्रणात केवळ ५० मिलि पाणी घालून भिजवून गोळा करावा. टेस्ट फ़ॉर लाईफ़च्या कणकीची अगदी मऊ थोडे तेल अधिक घालून कणीक भिजवावी. कणकीच्या गोळ्याची वाटी करुन त्यात पुरणाचा गोळा भरुन उंडा तयार करावा आणि मोदक पीठावर वा तांदूळाच्या पीठावर लाटावे. लाटायला सोपे जाते. तवा तापवून लाटण्यावर गुंडाळून पोळी उचलावी. एखाद्या मऊ सुती फ़डक्याने जास्तीचे पीठ हलकेच काढून पॊळी तव्यावर टाकावी. आणि उलथण्याने थोडेसे दाबून नीट खमंग भाजावी. तव्यावरच घडी करुन घेऊन खाली काढावी. खरोखर कौशल्य पणाला लागते पुरणपोळी करताना. परंतु पुरण तयार असल्याने अर्धे काम झाल्यात जमा आहे. आणि मऊसूत पुरणाचा उंडा होतो त्यामुळे पोळी फ़ाटत नाही आणि छान फ़ुलते. किंबहुना एवढे सोपे होते म्हणून मी पहिल्यांदाच पुरणपोळी करायचा विचार केला. कणकीत थोडीशी हळद घातली तर छान पिवळसर रंग येतो आणि कणीक अधिक मऊ भिजवली तर लाटायला अवघड होते पण पोळ्या अलवार होतात.

No comments:

Post a Comment