Friday, October 21, 2016

कढाई पनीर


कढाई पनीर विथ फुलका
 *पनीर* घरगुती पनीर छान मऊ करण्यासाठी दूध उकळून गॅस वरुन उतरवावे आणि एक लीटर दूध असेल तर एक वाटी पाण्यात लिंबूरस 1 लिंबाचा मिसळून घ्यावा. डावेने थोड़े थोड़े दूध घेऊन त्यात हे लिंबू पाणी घालावे. मग डावेतले दूध पातेल्यात मिसाळावे. असे सगळे दूध हळूहळू फाटेल. ते नीट मिक्स करून एका गाळण्यावर ओतावे. पाणी निथळले की एक ग्लास थंड पाणी  त्यावर ओतावे. सगळे मिश्रण फड़क्यावर ओतून थोडेसे पिळावे. मग उरेल ते पनीर . भाजीत घालायचे असेल तर चिमटिभर मीठ घालून मळावे आणि एका डब्यात वड्या थापतो तसे थापून फ्रीजमध्ये ठेवावे.

*भाजी* 3 कांदे उभे चिरावे त्यातील अर्धा कांदा बाजूला ठेवावा आणि उरलेला तेलावर जिरे घालून परतावा. त्यात तीन ते चार टोमॅटो चिरून घालावे. सगळे मऊ शिजल्यावर थंड करायला ठेबावे. दुसऱ्या कढ़ईत एक भोपळी मिरची , अर्धा कांदा तेलावर परतावा. कांदा टोमॅटो जो थंड करायला ठेवला त्याची प्यूरी करून घालावी. मग गालाजी किचन किंग मसाला, मीठ, लाल तिखट , थोड़ी मिरी पावडर, दालचीनी पावडर, गालाजी छांस मसाला चिमटीभर साखर, एक चमचा पाणी घालून झाकण लावून चांगले शिजवावे. मग पनीरचे तुकडे घालून चांगले मिसळून पाच मिनिटे ठेवावे. शेवटी थोड़ी कसूरी मेथी घालून गॅस बन्द करावा.

No comments:

Post a Comment