Monday, October 24, 2016

चिवड़ा

आज मस्त चिवड़ा केलाय. वास्तविक एवढ्या पावसात चिवड़ा कुरकुरीत कसा राहणार असा प्रश्न पडतो. पण त्यासाठी एक ख़ास तंत्र आहे. मन्द आचेवर कढ़ई टाकून पोहे परतायचे. तासभर लागेल कदाचित किलोभर नायलॉन पोहे असले तर. आजूबाजूची कामे करताना हे होते. मग तेलात दोन कोकमे तळून घ्यायची आणि बाहेर काढून ठेवायची. मग मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची आणि त्यात तीन चार हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालायचा. पंढरपुरी डाळं आणि काजू, भाजलेले शेंगदाणे घालायचे वर पोहे घालून चांगले परतायचे. चवीनुसार मीठ घालावे. थोड़ा गोडा मसाला घालावा. मी यावेळी गालाजी छांस मसाला आणि रोटी पराठा मसाला पण घातला. एक वेगळीच मस्त चव आली.

चिवड़ा परतून पूर्ण झाला की गॅसवरून खाली काढ़ावा आणि त्यात दोन तीन चमचे पीठीसाखर घालावी. जाड़ी साखर नीट विरघळत नाही आणि पीठीसाखर जर चिवड़ा करताना घातली तर चिवड़ा चिकट होतो.
महत्त्वाचे : चिवड़ा झाल्यावर तळलेली कोकमे चुरडून चिवडयावर घालावी आणि मग साखर घालावी

तयार चिवड़ा असाच खावा, कांदा, खोबरे, लिंबूरस घालून द्यावा वा उसळीवर घालून द्यावा.

No comments:

Post a Comment